
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील महसुल विभागाचे पथकाची अवैध रेती उपसा करुन अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई सुरुच आहे मात्र अवैध रेती माफीया कडून महसुल पथकाचे लोकेशन नजर ठेवण्यासाठी रोजनदारीने माणसे ठेवलेली आहे मात्र अवैध रेती व्यवसाईकाच्या खबऱ्यांना चकमा देत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अवैध रेती कारवाई पथक अपवाद ठरला तालुक्यातील मौजे पेसोडा येथील रस्त्यावर अवैध वाहतूक करणारे टिप्पर क्र mh २८ bb ५११५ चे वाहन सकाळी ६:३५ वाजता २ ब्रॉस अवैध रेती वाहतुक करतांना टिप्पर पकडले टिप्पर मालकावर दंडात्मक व जप्तीची कारवाई करित तामगाव पोस्टेला टिप्पर लावण्यात आले याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि तालुक्यातील पेसोडा रसत्यावर टिप्पर क्र mh २८ bb ५११५ चे सदर टिप्परला पथकातील महसुल कर्मचाऱ्यांनी पेसोडा रसत्यावर सकाळी संव्वा सहा वाजता थांबवुन रेती वाहतुक परवाना बाबत विचारले चौकशी केली असता विना परवाना २ बॉस अवैध रेती वाहतुक करतांना मिळून आल्याने टिप्पर मालक किसन रामभाऊ अढाव रा पेसोडा याच्या विरुध्द दंडात्मक कारवाई केली उपरोक्त टिप्पर जप्त करून तामगाव पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे. तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सदरची कार्यवाही मंडळ अधिकारी के एस तांबारे , ग्राम महसुल अधिकारी शिवानंद पागारे ,ग्राम महसुल अधिकारी गौरव पाटील ग्राम महसुल अधिकारी युवराज भोसले, वाहन चालक वी के सौदागर यांनी केली.



