महाराष्ट्रविशेष लेख
धामणगाव गोतमारे येथील ९ व्या वर्गात शिकणाऱ्या शेतकरी कन्या किशोर वयीन लेखिका मैथीली ची कादंबरी प्रकाशीत .


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील रहिवासी नर्सरी पासूनच तिच्या वडिलांनी तिचे शिक्षण शेगाव येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये तिला दाखल केले सद्या ९ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या शेतकरी कन्या कु . मैथीली पुरुषोत्तम गोतमारे हिचे “The Boon of Divine Blood” नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशीत झाले अवघ्या १४ व्या वर्षो साहीत्य क्षेत्रात तीने केलेली कामगिरी कुतुहलाचा विषय ठरला आहे.ही कांदबरी प्रवास आणि रहस्य यांवर आधारित असून, चंद्राच्या शोधाभोवती फिरणारे कथानक वाचकाला कल्पनारम्य विश्वास घेऊन जाते. विविध प्रवास. अनुभव आणि संघर्ष यांच्या माध्यमातून कथा उलगडत जाते आणि मानवी जिज्ञासा, ध्येयभावना व अंतर्मनाचा शोध अधोरेखित करते.
लेखिकेच्या या यशामध्ये तिथे तिचे वडील पुरुषोतम गोतमारे व आई सौ .लक्ष्मी गोतमारे यांच्या प्रोत्साहनमुळे साहित्यिक व तिच्या लेखनाला बळ मिळाले आहे. या कांदबरी चे प्रकाशन के डी. ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, शाळेच्या प्राचार्य मृणाल पाटील यांनी लेखिकेला वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे.हे पुस्तक दिल्लीस्थीत Bluerose Publishers Limited या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आले असुन Amazon,flipkart तसेच इतर ऑनलाईन विक्री मंचावर उपलब्ध आहे अशी माहीती तिचे वडील पुरुषोत्तम गोतमारे पाटील यांनी दिली



