बोडख्याचे युवा कवी दिपक उमाळे यांचा राज्य कवी युवा नायक पुरस्काराने गौरव


संग्रामपुर [प्रतिनिधी ] नाशिक येथे बीएसपी बहुद्देशीय संस्था अमरावती , संत कबीर संस्था व अपेक्षीत न्युज चॅनलच्या वतीने आयोजीत आवाज लेखनीचा दुसरा राज्यस्तरिय कवी संमेलनात संग्रामपुर तालुक्यातील बोडखा येथील युवा कवी दिपक यांना राज्य कवी युवा नायक पुरस्काराने गौरव करण्यात आला नासिक येथे आवाज लेखनीचा दुसऱ्या राज्यस्तरिय साहित्य समेलनात महाराष्ट्र राज्यातील नामवंत दिग्गज कवीनी सहभाग घेतला होता सदर कवी संमेलनात विदर्भातील आदिवासी बहुल संग्रामपुर तालुक्यातील बोडखा येथील लहान गावातील युवा कवी दिपक उमाळे यांनी कवीता सादर करून आयोजक व उपस्थित मान्यवर श्रोत्यांची मने जिंकली विदर्भाच्या लेखनीचा राज्यस्तरावर डंका वाजवुन राज्य कवी युवा नायक पुरस्काराचे मानकरी ठरले सदर पुरस्कार सन्मानचिन्ह साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कृष्णा मृगदल व भुषण सरदार या मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात युवा कवी दिपक उमाळे यांच्या लेखनीचा डंका राज्यस्तरावर वाजल्याने युवा कवी उमाळे यांचे राज्यभरातुन कौतुक होत आहे



