जिल्हा वार्ता

सोनाळा टुनकी शिवारात बिबट्याने पाडला हरिण , काळविटचा फडशा शेतकरी नागरिक भयभित

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा शिवार आणि दुनकी शिवार हरिण व काळविट या दोन वन्यप्राण्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घटना १८ मार्च रोजी उघडकीस आली सोनाळा शिवारात विजय भगत यांच्या शेत परिसरात प्रथम हरिण मृतावस्थेत आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुनकी शिवारात राहुल पुंडे यांच्या शेतात काळविट वन्यजीव प्राणी मृत अवस्थेत दिसून आला या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यात भयभीत झाले आहे. हिस्त्र प्राणी माणवावर हल्ले करतील याचा नेम नाही हा परिसर ओलीत असल्याने रब्बी पिकांना रात्री पाणी देणे तसेच अवेळी पिकांची निगा राखण्या साठी शेतात ये जा करावे लागले हिस्त्र प्राण्याचा या परिसरात वावर वाढल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे वनविभागाच्या संबंधीत अधिकारी यांनी शेतकरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना बिबट्याला जेरबंद करावा शेतकऱ्यांच्या सुरक्षतेच्या दुष्टि कोनातुन हिस्त्र वन्यप्राण्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!