जिल्हा वार्ताशिक्षण

पीएमश्री. जि.प. हायस्कूल संग्रामपूर १४ विद्यार्थ्यांची एनएमएमएस परिक्षेत यशस्वी भरारी

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] यशाची परंमपरा गुणवत्तेचा ध्यास उद्दिष्ट डोळ्या समोर ठेऊन योग्य मार्गदर्शन खाली जिद्द चिकाटीने अभ्यास यशस्वी भरारी सार्थ ठरवत पीएम.श्री. जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शाळेचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या शाळेच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाते त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षासाठी प्रति वर्ष 12 हजार असे एकूण 60 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत शाळेची मागील पंधरा वर्षाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यशवंत विद्यार्थ्यां मध्ये कोमल गोमासे, साक्षी भोपळे, अंकित गोतमारे, सुपेश सरदार, रोशनी वानखडे, पायल मोरखडे, पूर्वी हागे, ज्ञानेश्वरी पोफळणारे, गौरी वेरूळकर, विराज बारब्दे, शिवम उमाळे, श्रेया पुंडे, आचल डामरे, आणि सोहम उमाळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मुख्याध्यापक योगेश कुकडे यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशामागे शिक्षणाधिकारी.विकास पाटील , गटशिक्षणाधिकारी टाले , शाळेचे मुख्यध्यापक योगेश कुकड  , सह शिक्षक वृंद यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन त्यात शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोत्साहन त्यामुळेच विद्यार्थ्यांनी यशस्वी भरारी घेतली . यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!