महाराष्ट्र

बारी ब्रिगेडची राज्य कार्यकारणी घोषीत

 

संग्रामपूर [प्रतिनिधी] गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर बारी ब्रिगेडचे संस्थापक प्रल्हादराव दातार यांनी राज्य कार्यकारणीची निवड जाहिर केली. वरवट बकाल येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजीत राज्य स्थरीय पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पुणे येथील ओंकार काटोले यांची राज्याध्यक्ष पदी तर नाशिक येथील एकनाथ बारी व पणज ता . अकोट येथील उद्योजक विजय दातीर ह्या दोघांची राज्य उपाध्यक्ष निवड करण्यात आली. अकोला जिल्ह परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांची महासचिव तर अकोट येथील सेवानिवृत अधिकारी विजय अस्वार यांची महासंघटक पदी निवड करण्यात आली.राज्य महिला ब्रिगेड च्या अध्यक्षपदी अंजनगांव सुर्जी येथील सामाजीक कार्यकर्त्या शोभाताई सुने यांची तर उपाध्यक्षपदी यावल जिल्हा जलगांव खांन्देश येथील प्राध्यापिका संगीताताई बारी यांची निवड करण्यात आली. राज्य संघटक म्हणुन जळगांव येथील नितिन ढगे व नागपुर येथील काशिनाथ ताडे यांची निवड करण्यात आली.अकोला जिलाध्यक्ष पदी अकोली जहागीर येथील आदर्श शेतकरी तथा सामाजीक कार्यकर्ते गजानन धर्मे, जिल्हा संघटक पदी पणज येथील दिलीप अकोटकार तर अमरावती जिल्हाध्यक्ष पदी अंजनगांव सुर्जी येथील नगर पालीकेचे आरोग्य सभापती प्रविण नेमाडे यांची , अमरावती जिल्हा संघटक नितिन टिंगणे ( शिरजगांव बंड) यांची निवड करण्यात आली.निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्यांना संस्थापक प्रल्हादराव दातार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र,देवुन गौरविण्यात आले.सभेला वरवट बकाल, अकोट, अंजनगांव, अमरावती, नागपुर, जळगांव खांदेश आदी भागातील प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बारी समाजाचे नेते माजी सभापती पांडूरंग हागे, गजानन ढगे, जेष्ठ समाजसेवक प्रल्हाद आवंडकार. माजी उपसभापती सुभाष हागे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!