Uncategorized

पातुर्डा खुर्द येथील शिक्षक वसंत खंडारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 26 यावर्षी संग्रामपुर पं स अंतर्गत तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील जि प प्रा शाळेत कार्यरत वसंत सदाशिव खंडारे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा राज्यस्तरावर सन्मान झाल्याने सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
पुणे येथील निगडी परिसरातील ग दि माडगूळकर नाट्यगृहात एज्युकेशन आयकॉन्स समिट 2026 या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि २९ मार्च रोजी उत्साह पूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते सन्माननीय दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते वसंत खंडारे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून निवडक शिक्षकांची काटेकोर प्रक्रियेनंतर निवड करण्यात आली होती.
या प्रक्रियेत शिक्षक खंडारे यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मानाचे स्थान पटकावले. वसंत खंडारे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र ओळखले जातात तसेच विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेचा, सर्जनशीलतेचा, आत्मविश्वासाचा विकास करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबतच त्यांचा नैतिक, सामाजिक आणि भावनिक विकास होण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!