जिल्हा वार्ताशासकीय

नांदुरा येथे हाजी मुज़म्मिल अली खान मित्र मंडळाकडून S.I.R. मार्गदर्शक नमुना फॉर्म वाटप करुन केली जनजागृती 

नांदुरा येथे हाजी मुज़म्मिल अली खान मित्र मंडळाकडून S.I.R. मार्गदर्शक नमुना फॉर्म वाटप करुन केली जनजागृती

बुलडाणा [प्रतिनिधी ] महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी गठित केलेल्या S.I.R. जिल्हा समितीचे सदस्य हाजी मुज़म्मिल अली खान यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा शहरात S.I.R. मार्गदर्शक नमुना फॉर्म वाटप व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत हाजी मुज़म्मिल अली खान मित्र मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना S.I.R. मार्गदर्शक नमुना फॉर्म वाटप करून S.I.R. प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. फॉर्म कसा भरावा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणत्या चुका टाळाव्यात तसेच मतदारांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नागरिकांना सांगण्यात आले की, ३० जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या व २९ जुलै २०२६ पर्यंत चालणाऱ्या S.I.R. मोहिमेदरम्यान अधिकृत S.I.R. फॉर्म बी.एल.ओ. (Booth Level Officer) यांच्यामार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे बी.एल.ओ. आपल्या घरी आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य करावे, कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचा फॉर्म अचूक भरावा, सर्व माहिती पूर्णपणे नमूद करावी, स्वाक्षरी करावी आणि आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म जमा करावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच प्रत्येक मतदाराने आपला अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो तयार ठेवावा, आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी करावी आणि मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरू नये, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी हाजी मुज़म्मिल अली खान यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र मतदाराने S.I.R. प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंद अचूक राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना योग्य माहिती उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.या उपक्रमात नांदुरा क्रुषी उत्पन्न बाजार समिती चे हमाल मापारी वर्ग,नांदुरा शहरातील आटो चालक युनियन, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख, ईकरामोद्दीन मंडप वाले, शेख वहाब , मो तौसिफ , शेख बब्बु , शारिक भाई, मो सोहेल , मज़हर खान, बुडून खान,गुलाब खान,सूलतान कुरेशी,आसीम खान,नासिर खान,हबीब खान,पहेलवान साहेब,मो .हाशिम,अमिन रज़ा,हूसेन खान,ज़ाकिर टेलर,मो.ईल्यास,सय्यद नवेद बिट्टी वानखेडे, शेख निसार , शेख अज़ीम तसेच मित्र मंडळाचे सह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना S.I.R. मार्गदर्शक नमुना फॉर्मचे वाटप करून मोहिमेची सविस्तर माहिती दिली व अधिकृत फॉर्म बी.एल.ओ. यांच्याकडून मिळणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!