मेळघाट पॅशन ट्रेल उपक्रमाचे नागपुरात उद्घाटन तर इन्फ्लुएन्सर्सना मेळघाटच्या अंबाबरवा अभयारण्यात दाखल झाल्यावर दोन दिवशीय इन्फ्लुएन्सर्सनी जंगल सफारी,विविध एडवेंचर जैवविविधतेचा अनुभव

संग्रामपुर [प्रतिनिधी ] मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘मेळघाट पॅशन ट्रेल’ या उपक्रमाचे उद्घाटन नागपुरात उत्साहात पार पडले.या उपक्रमाच्या माध्यमातून वनविभागाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे नैसर्गिक सौंदर्य,समृद्ध जैवविविधता आणि स्थानिक संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे,व त्याचप्रमाणे इको पार्क मधील महिला बचत गटांनी घेतलेल्या कॅन्टीनमध्ये जेवणाचा स्वाद घेतला त्याच त्याचप्रमाणे महिला बचत गट चे कौतुक केले.
दिनांक.29 व 30 मार्च रोजी विविध इन्फ्लुएन्सर्स अंबाबरवा अभयारण्यात दाखल झाले,त्यांचे स्वागत वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे सोनाळा यांनी केले,या दोन दिवसांत इन्फ्लुएन्सर्सनी जंगल सफारी,विविध एडवेंचर उपक्रम तसेच वसाली संकुल येथे वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधत मेळघाटच्या नैसर्गिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला,या कार्यक्रमावेळी उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया ,सहाय्यक वनसंरक्षक जी.पी.टेकाळे , वनपरीक्षेत्र अधिकारी ए.एन.बावणे (सोनाळा),वनपाल जी.टी.सोळंखे,एस.डी.राठोड , किम असवानी (बंगलोर)
तनवीर देसाई (गोवा) गोकुल दास (केरला)
मनोज पी एम (केरला) सह सर्व वन रक्षक ,वन मजुर व वनकर्मचारी उपस्थित होते


