गौरी चोपडे पाटील हिची दहावीत चमकदार कामगिरी ९४.६० गुणांसह विशेष प्राविण्य

संग्रामपुर [प्रतिनिधी] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा करवी दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल जाहिर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व शेवटच्या घटकातील पाल्यांनी आपला ठसा उमटविला यामध्ये नेकनामपुर येथील शेतकरी कन्या गौरी गजानन चोपडे पाटील हिने ९४.६० टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्या सह उत्तीर्ण होऊन उल्लेखणीय यश संपादन केले आहे नेकनामपुर येथील सधन शेतकरी चोपडे कुटुंबात शैक्षणीक वातावरण असल्याने या घरात सुप्रसिध्द डॉक्टर , इंजिनिअर सह विविध शासकिय सेवेत कार्यरत असलेल्या अश्या कुटुंबात जन्मलेली त्यात रुपाली यास शिक्षणाची गोडी अभ्यासातील सातत्य मेहनत जिद्दीच्या बळावर तिने यश संपादन केले गौरीच्या यशामुळे चोपडे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन शिक्षक वर्गा सह आजी , आजोबा माजी सरपंच विठ्ठलराव चोपडे पाटील मोठे आजोबा त्र्यंबकराव चोपडे पाटील , सुप्रसिध्द डॉ प्रविण चोपडे पाटील यांनी गौरी चोपडे पाटीलचे कौतुक करित भविष्यात ती मोठे यश संपादन करिल असा विश्वास व्यक्त केला



