कृषी

आधुनिक तंत्रज्ञानाची कास… अभिता ऍग्रो कंपनीचा आगळा वेगळा उपक्रम

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रथमच ड्रोन फवारणीची सुविधा ! बुलढाणा

बुलढाणा :- आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती केल्यास ती सहज व सुलभ होते. एकेकाळी किर्लोस्कर कंपनीचा नांगर आला आणि या नांगराने शेतीला चालना दिली. आज कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. नव्हे ती गरजच निर्माण झाली आहे. शेत पिकावरील औषध फवारणी हे तर जिकरीचे काम, औषधांचा थेट संपर्क,याशिवाय वाढलेल्या पिकात पाऊल ठेवणे हे सुद्धा जीवावर उठणारे, नेमकी ही बाब हेरून अभिता ऍग्रो कंपनीने कृषी क्षेत्रात दमदार पाऊल टाकत हवाई फवारणी अर्थात ड्रोनचा पर्याय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला आहे. कपाशी, मका, ज्वारी ,उडीद , मका ,सोयाबीन यासह संत्री, मोसंबी, पेरू,आंबा बाग आदि फळझाडांवर ही फवारणी करता येणार आहे. एका एकरासाठी अवघे दहा मिनिटे आणि झटपट फवारणी… असा हा पर्याय आता बळीराजाला उपलब्ध झाला आहे.

अभिता ऍग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके हे कल्पक नेतृत्व, विविध अंगी प्रयोग त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये केले. संत्रा प्रक्रिया उद्योग, अभीता ऍग्रो कंपनी,चित्रपट निर्मिती अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी राबवल्य व यशस्वी केल्या.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी चा पर्याय असावा हा विचार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये घोळत होता. त्याला मूर्त रूप देत त्यांनी फवारणीसाठी भले मोठे ड्रोन उपलब्ध केले आहे.पीक वाढलेले असताना पिकावर औषध फवारणी करणे हे दिव्यच असते. पाठीवर स्प्रे पंप घेऊन काम करणे हे काम देखील अंग मेहनतीची आहे. शिवाय सर्प विंचू दंशच्या घटनाही घडतात. बळीराजाला मात्र हे धोके वारंवार पत्करावे लागतात. आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याच तंत्रज्ञानाची कास धरून ड्रोन फवारणीचा पर्याय प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. यासाठी कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी वाहन व कर्मचारी देखील प्रशिक्षित केले असून बुलढाणा येथे कंपनीचे ऑफिस सुरू करण्यात आले आहे.येथेच शेतकऱ्यांना फवारणी साठी संपर्क करता येणार आहे.

जिल्ह्यात यापूर्वी झाली होती हवाई फवारणी

1978- 80 च्या दरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या ज्वारीवर मीजमाशी (डोळकिडीचा) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. कीड पीक उध्वस्त करी, तत्कालीन सरकारने कीड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर द्वारा हवाई फवारणीचा निर्णय घेतला. त्याद्वारे जिल्ह्यात हवाई फवारणी केल्या गेली.केळवद च्या बेल्यामाळावर दोन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. येथे औषध भरून हेलिकॉप्टर ज्वारीवर हवाई फवारणी करत. यामुळे किडींवर तात्काळ नियंत्रण मिळवता आले होते. असे प्रत्यक्षदर्शी गणेश पांढरे यांनी सांगितले.हवाई फवारणीमुळे कीड नियंत्रणात झपाट्याने होण्यास मदत होते.

                वेळेची बचत व प्रभावी उपाय

एक एकर फवारणीसाठी अवघ्या सात आठ मिनिटांचा अवधी लागतो. यासाठी 90 टक्के पाण्याची बचत होते. शिवाय औषध प्रभावीपणे पिकांना लागू होतात. ड्रोन फवारणी हा पहिला व वेगळा उपक्रम शेतकरी बांधवांसाठी सुरू करत असल्याचे अभिता ऍग्रो कंपनीचे सीईओ सुनील शेळके म्हणाले. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने ना नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!