राजकीय

संग्रामपुर पंचायत समिती ८ गणाचे आरक्षण निश्चित ! 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील ८ गण पंचायत समिती साठी होणाऱ्या आगामी निवणुकीच्या पाश्वभुमिवर  तालुक्यातील आठ पंचायत समिती गणाचे आरक्षणास निश्चित करण्यात आले यासाठी तहसील कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन , नायब तहसिलदार जुनघरे यांची प्रमुख उपस्थिति होती दहा वर्षीय समृद्धी प्रवीण वडतकर या  मुलीच्या हातून ड्रा पद्धतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या व जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे यात टुणकी गण अनुसूचित जमाती महिला सोनाळा सर्वसाधारण महिला बावनबीर नागरिकांचा मागास प्रवर्ग वरवट बकाल सर्वसाधारण पळशी झाशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कवठळ अनुसूचित जाती वानखेड सर्वसाधारण महिला व पातुर्डा बुद्रुक सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले एकूण चार पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जाती व जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन गण त्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे तर उर्वरित सहा गणाचे आरक्षण चिठ्ठ्या काढून काढण्यात आले  आरक्षण सभा शांततेत पार पडली यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनिल जुनघरे , गटविकास अधिकारी माधव पायघन , लिपिक जी पी ठाकरे गोपाल बोंबटकार ,यांचे सह तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
                  बॉक्स
संग्रामपुर पं स अंतर्गत ८ गण संदर्भात आक्षेप नोंदवता येईल
 तालुक्यातील ८ गण पंचायत समिती साठी होणाऱ्या निवणुकीच्या पाश्वभुमिवर  तालुक्यातील आठ पंचायत समिती गणाचे आरक्षणास निश्चित करण्यात आले  आरक्षण संदर्भात १७ ऑक्टोबर पर्यंत आक्षेप नोंदवता येईल अशी माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यावेळी बोलताना दिली
संग्रामपुर तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गणाचे आरक्षण निश्चित
जि प गणाचे आरक्षण येणे प्रमाणे
पातुर्डा ( ईतर मागास ), सोनाळा ( एस टी महिला ), बावनबीर (स सा ) , पळशी झाशी ( ईतर मागास )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!