राजकीय
स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढवणार वंचितचा बैठकीतुन निर्धार

संग्रामपुर [प्रतिनिधी ] वंचित बहूजन आघाड़ी संग्रामपुर तालुका अध्यक्ष किशोर भिडे यांच्या नेतृत्वाखाली मंध्यवरती पक्ष कार्यालय वरवट बकाल येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिति निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीव वंचित युवा तालुकाध्यक्ष आशीष धुंदळे यानी भुमिका माडत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुक वंचित बहूजन आघाड़ी ताकदीने लढण्यासाठी सज्ज आहे व ईच्छुकांची गर्दी सुध्दा वंचीत बहुजन आघाडी कडे होत आहे . पंचायत समिति वर वंचित बहूजन आघाड़ीचा झेडा असेल असा निर्धार बैठकीतुन पदाधिकाऱ्या सह कार्यकर्यानी केला. यावेळी वंचित बहूजन आघाड़ीचे तालुकाध्यक्ष किशोर भिडे , सह आजी माझी पदाधिकारी कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



