शिक्षण
मोहम्मद यासीर याची एमबीबीएस साठी निवड झाल्या बद्दल कुटुंबाचा सत्कार


संग्रामपुर [प्रतिनिधी ] मोहम्मद यासीर याची शासकीय कोठ्यातुन निशुल्क एमबीबीएस साठी निवड झाल्या बद्दल स्थानीक उर्दु शाळा , स्कुल पातुर्डा ग्रामस्थांच्या संयुक्त विदमाने भावी डॉक्टर मोहम्मद यासिर यांच्या कुटुंबीयासाठी छोटे खानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब बाहेकर उर्दु हायस्कुलच्या प्रांगणात करण्यात आले होते तालुक्यातील पातुर्डा येथील दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुल येथे कार्यरत शिक्षक मोहम्मद यासिन यांचा मुलगा मोहम्मद यासीर मोहम्मद यासिन यांचे माध्यमीक शिक्षण अमरावती येथील युनिक स्कुल मध्ये झाले वैधकिय परिक्षेत पात्र साठी रॅक १० हजार मध्ये घवघवीत यश संपादन केले वैधकिय शिक्षण एम बी बी एस साठी शासकीय कोठ्यातुन नागपुर जी एम सी वैधकिय कॉलेज ला प्रवेश साठी पात्र ठरला अकोला येथील ललीत टुटोरियल कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी मोहम्मद यासिर याची शासकीय कोठ्यातुन एमबीबीएस साठी निशुल्क प्रवेश मिळाल्या बद्दल त्याचे वडिल शिक्षक मोहम्मद यासिन यांच्या सह कुटुंबांचा पातुर्डा ग्रामस्थ व जि प उर्दु उच्च प्राथमिक व दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुल यांच्या सयुक्त विद्माने शाल गुलपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दादासाहेब उर्दु हायस्कुलचे मुख्याध्यापक कलीम खॉन , जि प उर्दु उच्च प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक मोहम्मद मुशताक , शिक्षक शेख क्युम, आसिफउर्र रहेमान , शेख नसिम , शकिल अहेमद , अब्दुल करिम , शेख ईम्रान , तौसिफ अहेमद खान, सैय्यद असलम , शेख फरजान आतिफ , शिक्षीका नाहिद अखतर , कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय कर्मचारी जावेद एकबाल, ईरफानोद्दीन काझी, शेख तुकडू यांनी प्रयत्न केले



