किशोर गारोळे यांच्या प्रचारार्थ गवळी समाज बांधव स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर
माताभगिनींचाही समावेश, किशोर गारोळे यांचा विजय निश्चित असल्याचे व्यक्त केले मत

मेहकर, प्रतिनिधी :- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या रॅलीत फिरणे म्हणजे सत्कार्य करणे, अशी भावना मेहकर शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. गारोळे यांना निवडून आणून नगराध्यक्षपदी विराजमान करणे, हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला सर्वचजण तयार आहेत. किशोर गारोळे हे जात-धर्मापलिकडे गेलेले व्यक्तिमत्त्व असून एक सर्वोत्तम माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच आज (ता. 22) रोजी मेहकरमधील प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 मध्ये निघालेल्या त्यांच्या रॅलीत गवळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. किशोर गारोळे हे भेटीगाठीसाठी येत असल्याचे कळताच उपरोक्त प्रभागातील सर्व गवळी समाज बांधव स्वयंस्फूर्तीने त्यांच्या रॅलीत सहभागी झालेत. यावेळी मायमाऊल्या देखिल उपस्थित होत्या. आम्ही विधानसभा निवडणुकीवेळी मशाल चालविली, आता नगर परिषद निवडणुकीवेळी देखिल मशालच चालवणार, असा सूर यावेळी गवळी समाजबांधवांचा होता. किशोर गारोळे हे जनतेने निवडलेले जनतेचे उमेदवार आहेत. त्यामुळे जनतेच्या उमेदवाराचाच विजय निश्चित आहे, अशा आंतरिक भावनादेखिल अनेकांनी व्यक्त केल्या. किशोर गारोळे यांना निवडून आणणे हे सर्वांचेच ध्येय बनले आहे. म्हणूनच सर्व समाजबांधव त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांचा प्रचार करीत आहेत. ‘ही लाट अशी आली, विजय लिहिल्या जाईल किशोर गारोळे यांच्या भाळी’ असेच आजच्या त्यांच्या प्रचार रॅलीमधून दिसले.



