आरोग्य
पळशी झाशी ग्रा पं येथे १७६ नेत्र रुग्णाची तपासणी समता फाऊंन्डेशनच्या वतीने जळगाव खांन्देश येथे होणार ४० मोतीबिंदू रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी ग्रा पं समता फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा पं सभागृहात सरपंच प्रियंका राहुल मेटांगे यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले सदर नेत्र तपासणी शिबिरामध्ये डॉ विजय शिरसाट, तर समता फाउंडेशनच्या टीमचे राम वाघ , कार्तिक चराटे , यानी १७६ रुग्णांची नेत्र तपासणी केली, त्यात ४० रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची समता फाउंडेशन मार्फत दि २८ नोव्हेंबर रोजी मोतीबिंदू शास्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव खान्देश या ठिकाणी करण्यात येणार आहे, प्रवास भाडे सह सर्व व्यवस्था समता फाउंडेशन करणार आहे. नेत्र तपासणी शिबिर प्रसंगी डॉ विजय शिरसाट व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी सहकार्य केल्या बद्दल पळशी झाशी ग्रा पं च्या वतीने ग्रामविकास अधिकारी हेमंत देशमुख यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला सदर शिबीर यशस्वीते साठी ग्रा पं सदस्य, कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर स्वप्निल मारोडे हर्षल तांगडे, प्रफुल करांगळे यांनी प्रयत्न केले



