क्राईम

रसत्याने मुलीची दुचाकीवरून पाठलाग छेडखानी करणाऱ्या ४ टवाळखोरांना अटक सोनाळा पोलीसांची कारवाई

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी येथुन साहित्य खरेदी करून दोन मुली सह भाऊ दुचाकी घरी जातांना टुनकी येथील २ आरोपींनी रसत्याने जाणाऱ्या मुलीना पाहून दुचाकी ओवर टेक करून हॉर्न वाजवला व वेळोवेळी मुलीकडे पाहून पाठलाग करणाऱ्या २ व त्याला सहकार्य करणारे २ सोनाळा पोस्टेला ४ टवाळखोर आरोपी विरूध्द विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सोनाळा पोलिसांनी संबंधीत आरोपींना अटक केले
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि सोनाळा येथील तिघे बहिन भाऊ टुनकी येथे मॉल मध्ये साहित्य करण्यासाठी गेले होते साहित्य खरेदी करुन घरी दुचाकीने जात असतांना २ आरोपींनी दुचाकी वरून ओवर टेक व हॉर्न वाजवुन वाईट उद्देशाने वेळो वेळी मुलीकडे पाहून पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना दि २१ नोव्हेंबर रोजी सोनाळा पोस्टे हद्दित सकाळी साडे अकरा वाजता घडली याबाबत फिर्यार्दीचा नातेवाईक विचारण्यासाठी गेले असता ४ आरोपींनी शिवीगाळ करून मारहान केली या बाबत सोनाळा पोस्टेला पिडीत मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यार्दी वरुन आरोपी रोशन गोविंद लोणकर , गणेश किसन मेहनकर या दोघांना मदत करण्यासाठी आलेले आरोपी राजु अजाबराव लोणकर व अजय गजानन मातोडे सर्व रा टुनकी कलम ७८ ,१२६ (२ ) , ११५ (२ ), ३५२ , ३५१(२) ,३५१(३ ),३(५ ) भारतीय न्याय संहीता २०२३ सहकलम १२ बालकांचे लैगिक अपराधापासुन संरक्षणा अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केला असुन ४ आरोपींना सोनाळा पोस्टेचे हे कॉ विनोद शिंबरे , मोहन पवार , विनोद वानखडे, पो कॉ राहुल पवार , संदिप सुसर यांनी अटक केले सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे हे पुढील तपास करित आहेत

बॉक्स

महिला बालक व शाळकरी मुलीची छेडखानी करणाऱ्याची टवाळखोरांची निर्भिड पणे सोनाळा पोस्टेला माहिती द्या
ठाणेदार संदीप काळे यांचे आव्हान

सोनाळा पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की महिला व बालक तसेच शाळकरी विद्यार्थिनी यांची छेड कोणी काढत असल्यास त्याबाबतची माहिती निसंकोच पणे आम्हाला आमचे मोबाईल नंबर 7972011172 वर द्यावी किवा गावातील संबंधीत पोलीस कर्मचारी यांना द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल निसंकोच पणे छेडखानी करणाऱ्यांची माहिती देण्याचे आव्हान सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!