प्रभाग क्रमांक ५ : काँग्रेसच्या उमेदवारासाठी महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रचार

चिखली प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगत असताना काँग्रेसच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ महिला वर्ग मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरला. सकाळपासूनच महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या, मतदारांशी संवाद साधत उमेदवाराच्या कामांचा आणि पक्षाच्या भूमिकेचा खास उल्लेख केला.
हातात पक्षाचे झेंडे, ओढणीत पक्षाचं चिन्ह आणि घोषणांनी परिसर भारून गेला होता. महिलांनी विशेषत: विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षितता आणि महिला सबलीकरण या मुद्द्यांवर भर देत मतदानाचा निर्धार वाढवला.
या मोहिमेत तरुणीं पासून ज्येष्ठ महिला पर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला. “विकास आणि बदलासाठी काँग्रेसच योग्य पर्याय” असा संदेश त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचविला.
स्थानिक पातळीवर महिलांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा संचारली असून प्रभाग ५ मध्ये प्रचाराला आणखी वेग आल्याचे दिसून येत आहे.



