क्राईम

संग्रामपुरात दुकाना समोरून चोरट्यांनी पळविलेली बुलेरो पातुर्डा रसत्यावर शेतात आढळली ५० हजाराचे साहित्य लंपास

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] येथील साबीर टिंब्बक मार्ट फॅनिचर दुकाना समोर महिंदा कंपनीचे बुलेरो पिक अप अज्ञात चोरट्याने दि २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पळविली दि २५ नोव्हेबर सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चार चाकी महिंद्रा पिकअप वाहना चोरीस केल्यास उघडकीस आली संग्रामपुर बस स्टॅन्ड जवळ साबीर टिंब्बक मार्ट फॅनिचर दुकान असुन मोहम्मद नाजीम शेख अयुब यांच्या मालकीचे महिंदा कंपनीचे बुलेरो पिकअप क्र MH 06 G 6897 असलेले वाहन फॅर्निचर दुकान समोर नेहमी प्रमाणे लावले होते दि २४ नोव्हेबर च्या रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी निघुन गेले दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी गेले व दुकान समोर उभी असलेल्या बुलेरो पिक वाहना बाबत आजु बाजु दुकानदारांकडे तसेच परिसरात चौकशी केली असता मिळून आली नाही अज्ञात चोरट्याने पळविलेली सव्वा लाख रुपये किंमतीचे बुलेरो पिक अप पातुर्डा रोड लगत एका शेतात तिसऱ्या दिवशी बेवारस अवस्थेत मिळाली खरी मात्र चोरट्यांनी बुलेरो पिक अपचे २ टायर १ स्टेपनी जॉक , पाने , बॅटरीक , चॅन ब्लाक , सेल , असे एकुण ५० हजार रुपायाचे आदि साहित्य लंपास केल्याचे वाहन चालक मालक व तपास कामी आलेले पोलीस जमादार बोरसे व त्यांचे सहकारी शेतात घटना स्थळी पोहचल्या नंतर निदर्शनास आले तामगाव पोलीस स्टेशनला मोहम्मद नाजीम शेख अयुब रा संग्रामपुर यांच्या फिर्यार्दी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सहाय्यक पो उप निरिक्षक रामकिसन माळी करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!