क्राईम

धारणी पोलिसांनी दिले आठ गोवंशंना जीवनदान ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या पथकाची कामगिरी

बुलडाणा [प्रतिनिधी ] अमरावती जिल्हयातील धारणी पोस्टेचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या पथकाने मध्यप्रदेशातुन तापी नदी पात्रातुन आणलेले टिंगऱ्या गावालगतच्या स्मशाना जवळील नाल्यामध्ये अत्यंत कृरतेने ८ गोवंश हातपाय बांधून उपाशी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याच्या गुप्त माहिती वरुन छापा टाकला असता १ बैल व ७ गाय असे एकुण ८ गोवंश अंदाजी किंमत १७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि धारणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून तापी नदी पार करून आणलेली ७ ते ८ गोवंश जातीची जनावरे टिंगऱ्या गावालगतच्या स्मशाना जवळील नाल्यामध्ये अत्यंत कृरतेने, हातपाय बांधून उपाशी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली आहे धारणी पोस्टेचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी तात्काळ सुत्रे हलवित पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्या नेतृत्वात पथक घटना स्थळी  पाठवुन गोवंश ताब्यात घेतले पोलीस अमलदार मोहित आकाशे यांच्या फिर्यार्दी वरुन धारणी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद ,पोलीस अधीक्षक डॉ पंकज कुमावत ,उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गरुड यांच्या आदेशाने ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार सतीश राठोड, मोहित आकाशे, जगत तेलगोटे. मंगेश मानमोडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!