
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे दिसुन येत आहे यापुर्वी काकणवाडा पातुर्डा बु पुर्णा काठ काझीखेड तर आता तालुक्यातील चोंडी गाव पुला जवळ नदीच्या पात्रात या भागातुन त्या भागात बिबट्याचे नेहमी दर्शन होत आहे शेतकरी मजुरांसह वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाले सदर घटनेची वार्ता वाऱ्या सारखी चोंडी काकोडा परिसरात पसरली त्यामुळे शेतकरी मजुरात दहशत पसरली असुन वनविभागाने बिबट्याला विना विलंब जेर बंद करून शेतकरी मजुर नागरिकांना भय मुक्त करावे अशी मांगणी ग्रामस्था कडून होत आहे काकणवाड्यात बिबट्याचा वान नदि काठावर मुक्त संचार बाबतचे चित्रण हौशी युवक मजुरांनी मोबाईल मध्ये घेऊन सोशल मिडीयावर वायरल केले होते या भागातुन त्या भागात बिबट्याचे नेहमी दर्शन होत असल्याने ग्रामस्थात दहशतीचे वातावरण पसरले आहे सद्या तुर सोंगणी सुरु आहे तसेच हरबरा गहू पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे त्यात काहि भागात कृषि विज पुरवठा कधी रात्री तर कधी दिवसा सुरु असते शेतकऱ्यांना रात्री बे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाने येणे करावे लागते तेव्हा बिबट्याच्या मुक्त संचारामुळे याभागातुन त्या भागात दर्शन होत असल्याने शेतातील कामे करने प्रभावीत झाले आहेत वनविभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी लक्ष देउन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मांगणी शेतकरी चोंडी , काकोडा ग्रामस्था कडून होत आहे



