क्राईम

पातुडर्यात डॉक्टर झाडोकार यांच्या घराचा कोंडा व कुलुप तोडून सोन्याचे दागिणे , रोखड , ७० हजाराचा मुद्देमाल लंपास ! ३ चोरटे सीसी कॅमेरेत कैद

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील कुलुप बंद असलेल्या डॉ अविनाश झाडोकार यांच्या घराची कळी व कुलुप तोडून ३ अज्ञात चोरट्यांना घरात प्रवेश केला दुसऱ्या मजल्यावर कपाटचा लॉकर तोडून १२ ग्रॅम जुनी सोन्याची पोत किं ४० हजार व ३० हजार रोखड एकुण ७० हजाराचा मुद्दे माल लंपास केल्याची घटना दि १ मार्च रोजी मध्यरात्री अडिच घडली मुख्य रसत्यावर सीसी टिव्हि दोन्ही कडून असल्याची माहिती असल्याने घटना स्थळा जवळील एका बोळीतुन दुचाकी व्दारे धुम ठोकली तर दि २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने डॉ झाडोकार यांना घटने माहिती त्यांना समजताच त्यांच्या पुतन्याच्या लेखी तोडी फिर्यार्दी वरुन ३ अज्ञात चोरट्या विरूद्ध तामगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि पातुर्डा येथील डॉ अविनाश झाडोकार हे पुणे येथे डॉक्टर दाम्पत्य मुलांच्या भेटीला व दवाखाना कामा निमित्त घराला कुलुप लावुन गेले होते घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यांनी डॉक्टरांच्या घराला लक्ष करुन घराचा कोंडा कापुन कुलुप तोडून घरात चोरट्यांनी प्रवेश केला दुसऱ्या मजल्यावरिल कपाटचे लॉकर तोडून त्यातील १२ ग्रॅम जुन्या सोन्याची पोत किं ४० हजार व ३० हजार रोखड एकुण ७० हजाराचा मुद्देमाल चोरुन नेले हे सर्व घटना डॉक्टर यांच्या घरा समोर महादेव भड यांच्या घरात लावलेल्या सीसी टिव्ही कॅमेरा मध्ये ३ अज्ञात चोरटे कैद झाली सदर घटनेची माहिती तामगाव पोलीसाना समजताच तामगाव पोस्टेचे दुय्यम ठाणेदार राजेन्द्र पवार , रामकिसन माळी ,बीट जमादार प्रमोद मुळे , पो हे कॉ आखरे सह पोलीस कर्मचारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहनी करून पंचनामा केला तामगाव पोस्टेला शुभम विष्णु झाडोकार वय २९ वर्ष रा पातुर्डा खुर्द यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरुन ३ अज्ञात चोरट्या विरुध्द कलम 331 (4), 305 (अ), 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोउपनि जिवन सोनवणे करित आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!