राजकीय

शिंदे सेनेतून घरवापसीचा सिलसिला सुरू; गणेश भवर पुन्हा भाजपमध्ये!

आ.श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विष्णू मेथे यांच्यानंतर आणखी एकामागोमाग घरवापसी सुरुच...

रमीज राजा चिखली प्रतिनिधी :-    चिखली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातून शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी युवा नेते विष्णू मेथे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून भाजपमध्ये घरवापसी केली होती. आता गोदरी येथील गणेश भवर यांनीही शिंदे सेनेला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत गोदरीतील अन्य चार कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत गणेश भवर यांच्या गळ्यात भाजपचा पक्षरुमाल घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी नाराजीतून त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. गणेश भवर यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद भवर, विठ्ठल परिहार आणि सखाराम सोरमारे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार श्वेता महाले यांनी स्वागत करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी विष्णू मेथे यांनीही शिवसेनेतून भाजपमध्ये घरवापसी केली होती. आता गणेश भवर यांच्यासह गोदरीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे अशा घरवापसीच्या घडामोडींना पुन्हा गती मिळाली आहे.आता हे कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये परतत असल्याने स्थानिक पातळीवरील महायुतीमधील समन्वय आणि भाजप-शिवसेनेतील मूळ संघटनात्मक संबंध नव्याने दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे शिवसेनेचे मूळ कार्यकर्ते शिवसेनेत सक्रिय असून, दुसरीकडे भाजपमधील नाराजीतून अन्य पक्षात गेलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीला नव्याने चालना मिळत असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळातही पक्ष संघटनेत आणखी कार्यकर्त्यांची घरवापसी होणार असल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या वेळी नीरज गायकवाड, वाणी समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश भवर, गोपाल तुपकर, भाजपचे युवा नेते विष्णू मेथे, बद्री औटी, पंजाब देशमुख, सतीश काकडे, नगरसेवक विष्णू जोगदंडे, स्नेहल वानखेडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!