क्राईम

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र महासचिवपदी श्री बळीरामजी बोबडे यांची नियुक्ती

सुलतानपूर: आज नाशिक येथे अखिल भारतीय हिंदू महासभेचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री भगवानराव पाटील सुलताने यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय अध्यक्ष श्री स्वामी विजय नारायण भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राष्ट्रीय संघटन प्रभारी व राष्ट्रीय संरक्षणप्रमुख श्री एडवोकेट अनिल शर्मा आणि श्री ठाकूर भूवालसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बळीरामजी बोबडे यांची अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र महासचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.या सोबतच महाराष्ट्र संयोजकपदी श्री सुदर्शन भाऊ पंचाळ, महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री दिलीपराव बोडके, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री गणेशराव ढवळे, तसेच लोणार तालुका संयोजकपदी श्री केशवराव देवडे यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.या प्रसंगी नाशिकमधील अनेक उद्योजक, व्यापारी व समाजसेवक बंधूंनी अखिल भारतीय हिंदू महासभेमध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समाजप्रेमी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रात हिंदू महासभेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!