बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी ॲड प्रसेन्नजीत पाटील

संग्रामपुर [प्रतिनिधी ] बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदि ॲड प्रसेन्नजीत पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रॉष्ट्रवादी कॉग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे एका नियुक्ती पत्राव्दारे केली नगर परिषद , जिल्हा परिषद व पंचायत निवडणुक अनुषंगाने ॲड प्रसेन्नजीत पाटील यांची राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्षाची बाजु भक्कम झाली असुन राजकारण सह समाजकारण सर्व घटकातील कार्यकर्त्यांना समान न्याय देऊन उत्कृष्ट पक्ष संघटनाचा दांडगा अनुभव पाहता राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी अच्छे दिन येणार असल्याची चर्चा पदाधिकारी कार्यकर्त्यात होत आहे बुलडाणा जिल्हा रॉष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती पत्र देतांना वेळी माजी खासदार विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महीला काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड रोहीणी खडसे,आदीत्य पाटील उपस्थित होते अड प्रसेंन्नजीत पाटील यांची राष्ट्रवादी कॉग्रेस बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल ठिक ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोश केला त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे



