चिखलीत सर्व सामान्य घराण्यातील नवीन युवा दमदार चेहरा राजकारणात!
प्रभाग क्र. ०७ साठी अनिल इंगळे मैदानात; जनतेत नवीन उमेदवाराची चर्चा

चिखली प्रतिनिधी : चिखली नगर परिषद २०२५ च्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्र. ०७ मध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले श्री. अनिल इंगळे यांनी थेट मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने चिखलीच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन ऊर्जासोबत प्रगतीच्या नव्या वाटा!
श्री.अनिल शिवाजी इंगळे यांच्या नावाची सोशल मीडियावर तसेच प्रभाग क्र. ०७ मध्ये, राजकीय पाठबळ नसतानाही चर्चा जोरदार सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील तसेच वॉर्डातील विद्यमान उमेदवारांमध्ये मोठ्या अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
निःस्वार्थ कार्यकर्ता आणि युवकांचा आधारस्तंभ
अनिल इंगळे यांची ओळख केवळ एक कार्यकर्ता म्हणून नसून, ते निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या १० वर्षांपासून ते कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता, भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा घटकाचा थेट पाठिंबा नाही, तरीही त्यांच्या कामाच्या बळावर त्यांनी हजारो युवकांची मने जिंकली आहेत.
‘जय मातादी नवरात्र उत्सव मंडळ’ या सामाजिक कार्य करणाऱ्या मित्र मंडळाच्या नावाने ते वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आणि गरजूंना आर्थिक मदत करण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, वर्षभर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर त्यांचा भर असतो. कोणताही गरजू व्यक्ती असो, त्याची मदत करणे, त्यांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे काम नेहमी सुरू असते. त्यामुळेच असंख्य युवकांमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रेम आणि आपुलकीची भावना आहे.
जनतेत मोठी आशा
राजकीय पाठबळ नसतानाही, अनिल इंगळे यांनी आपल्या निःस्वार्थ कार्यामुळे आणि युवकांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे आपली एक मजबूत प्रतिमा तयार केली आहे. त्यांचे समर्थक ठाम विश्वास व्यक्त करत आहेत की, ते प्रभाग क्रमांक ०७ च्या विकासाला एक नवीन आणि प्रभावी दिशा देतील.
सध्या कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी अनिल इंगळे यांच्यासारखा निष्ठावान आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला युवा चेहरा मैदानात उतरल्याने, प्रभाग क्र. ०७ मधील निवडणूक प्रक्रिया अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
*जनतेचा महत्त्वाचा प्रश्न: कोणत्याही राजकीय घटकांचा थेट पाठिंबा नसताना, केवळ स्वतःच्या निष्ठा, कार्य आणि युवकांच्या प्रेमाच्या बळावर अनिल इंगळे हे प्रभाग क्र. ०७ च्या राजकारणात नवे पर्व सुरू करतील का? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण सध्या तरी हजारो लोक त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत.



