राजकीय

घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे – अजितदादा पवार महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी दिली ग्वाही

चिखली : राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महायुतीच्या राजकीय मोहीमेला बळ देणारा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. प्रसंगी संवाद साधताना अजितदादांनी दिलेला ठाम संदेश हा संपूर्ण सभागृहातील वातावरणाला उत्साही करण्यास पुरेसा ठरला.“कुठल्याही दबाव तंत्राला घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा थेट विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवत अजितदादा म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना पुढील काळात कुठलीही अडचण आली, तर प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या माध्यमातून माझ्याशी तात्काळ संपर्क साधा. तुमच्या प्रत्येक समस्येची जबाबदारी माझी असेल.” कार्यक्रमादरम्यान त्यांनी चिखलीच्या स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. शहरात पसरलेल्या भीती, धाक आणि द्वेषाच्या वातावरणावर टीका करत ते म्हणाले की, “येणाऱ्या काळात चिखली शहरातून द्वेषाचे राजकारण पूर्णतः संपवायचे आहे आणि हे शहर भयमुक्त करायचे आहे.” त्यांच्या या संदेशाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.अजितदादांच्या ठाम व आश्वासक भूमिकेमुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून ते अधिक ऊर्जा घेऊन राजकीय मोहीमेत उतरले आहेत. स्थानिक नेतृत्व म्हणून प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या या बळामुळे संपूर्ण संघटनाच अधिक सजग आणि सक्रिय झाली आहे.कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह, महायुतीतील एकजूट आणि उपमुख्यमंत्र्यांची थेट ग्वाही या तिन्ही गोष्टींच्या जोरावर महायुतीचे उमेदवार आगामी निवडणुकीत विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करतील, असा विश्वास स्थानिक राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!