राजकीय

जनतेचे उमेदवार होणार नगराध्यक्ष किशोर गारोळे मेहकरचा विकास करण्याची धमक गारोळे यांच्यामध्येच, मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास

मेहकर प्रतिनिधी :- मेहकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे हे जनतेचे उमेदवार आहेत. त्यामुळे जनतेने निवडलेल्या उमेदवाराचाच विजय होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे हेच नगराध्यक्ष होणार आहेत, असा विश्वास आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी गणपती गल्ली येथे (ता. 26) सायंकाळी 7 वाजता पार पडलेल्या सभेवेळी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव चांगाडे तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सिद्धार्थ खरात, वर्धाचे विधानसभा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, भंडारा चे विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाप्रमुख ॲड. आकाश घोडे, माजी नगर परिषद सभापती भास्करराव गारोळे, प्रा. सतीश ताजने, सखाराम लाहोटी, गजानन गाडेकर, स्वातीताई नवले, आरतीताई देशमुख, उत्तमराव राजगुरू, विलास शिंदे होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे, प्रभाग क्रमांक 8 अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार नितिन तुपे, प्रभाग क्रमांक 8 ब च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार अश्विनी खंडागळे यांचीदेखिल उपस्थिती होती. या तिघांच्या प्रचारार्थ उपरोक्त सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, वर्धाचे विधानसभा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, भंडारा चे विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, डॉ. शिवाजीराव चांगाडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर गारोळे यांच्यातच मेहकरचा विकास करण्याची धमक आहे, असा विश्वास उपरोक्त मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे यांनीदेखिल मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की मेहकर नगरीला महाराष्ट्राच्या नकाशावर विकासत्मकदष्ट्या एक नंबरवर आणायचे आहे. त्यासाठीच मी जनतेच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बनलो आहे. जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच आपल्या मेहकर शहराचा विकास होणार आहे, असेही ते म्हणाले. त्यासाठी किशोर गारोळे हे नाव अन् त्यासोबतच मशाल चिन्ह् असलेले पाचव्या क्रमांकाचे बटण दाबायचे आहे, हे देखिल त्यांनी आवर्जून सांगितले. यासोबतच नितीन तुपे यांचे दुसऱ्या क्रमांकाचे अन् अश्विनी खंडागळे यांचे प्रथम क्रमांकाचे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे, असे गारोळे म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन अन् आभार ॲड. राहुल तुपे यांनी मानले.

  • शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रा. सतीश ताजने अन् नगरसेविका पदाच्या उमेदवार रुपालीताई गारोळे यांच्या प्रचारार्थ देखिल प्र्भाग एक मध्ये पैनगंगा नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये सभा पार पडली. यावेळी प्रा. सतीश ताजने यांचे दुसऱ्या क्रमांकाचे तर रुपालीताई गारोळे यांचे तीन नंबरचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. यासोबतच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे यांचे पाचव्या क्रमांकाचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात, प्रा. आशिष रहाटे यांच्यासह मान्यवरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!