लोणार नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मीराताई भूषण मापारी यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरात धडकणार काँग्रेसच्या मुलुख मैदानी तोफा
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ व आमदार साजिद खा पठाण यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार जाहीर सभा

लोणार प्रतिनिधी :- लोणार नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मीराताई भूषण मापारी यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे लोणार मेहकर विधानसभा समन्वयक देवानंद पवार यांची राहणार प्रमुख उपस्थिती दिनांक 29 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ अकोला मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार साजिद पठाण यांची मुलुख मैदानी तोफ दिनांक 29 नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या नगरपरिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मीराताई भूषण मापारी व दहा प्रभागातील वीस नगरसेवकांच्या प्रचारार्थ धडकणार आहे यासोबतच काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता लोणी रोड वरील कमळजा पेट्रोल पंपाच्या मागील भव्य मैदानात सायंकाळी ४ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला जास्तीत जास्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश मापारी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात नगरपरिषद गटनेते भुषण पाटील मापारी शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले आहे



