मनोरंजन

पुणे येथे राज्यस्तरिय गीत गायन स्पर्धेत ढोलकी वादक श्रीकृष्ण हातेकर व भीम शाहिर भगवान शिरसाठ यांचा सिमा पाटील यांच्या कडून सन्मान 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] देहूरोड बुध्द विहार कृती समिती पुणे येथे राज्यस्तरिय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गीत गायन स्पर्धेत राज्यभरातील शाहिर  सहभागी झाले होते संग्रामपुर तालुक्यातील सुप्रसिध्द शाहिर भगवान शिरसाट व ढोलकी वादक श्रीकृष्ण हातेकर यांनी या राज्यस्तरिय गीत गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता भीम शाहिर भगवान शिरसाट व ढोलकी वादक शाहिर श्रीकृष्ण हातेकर यांचा सिमाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मान करण्यात आला  बुद्ध विहार कृती समिती धम्मभूमी देहूरोड पुणे येथे २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत ढोलकी वादक श्रीकृष्ण हातेकर यांनी उत्कृष्ठ ढोलकी वाजवली तर भीम शाहीर भगवान शिरसाट यांनी भीम गीत सादर केल्या बद्दल दोघांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत  सिमाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पारोतोषिक देऊन सन्मानीत केले संग्रामपुर तालुका विशेष ग्रामीण भागाचे नाव उज्वल केल्या बद्दल भीम शाहिर भगवान शिरसाट व शाहिर तथा ढोलकी वादक श्रीकृष्ण हातेकर यांचे कलावंत सह सर्व स्तरावरून कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!