आंदोलन

वानखेड ग्रा पं चे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे यांची बदली तात्काळ रद्द करा ग्रामस्थांची मांगणी

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वानखेड ग्रा पं कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेंगे हे प्रामाणिक, निर्भीड व नियमांशी तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक कारभार करत ग्रामपंचायतीतीलगैरप्रकाराला आळा घातला असून शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करणारे आहेत त्यामुळे ग्रामविकास अधिकारी मेहेंगे यांची बदली झाल्यास वानखेड गावातील सुरु असलेली विकासकामे ठप्प होतील ग्रामविकास अधिकारी मेहेंगे यांची बदली त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना व वानखेड ग्रामस्थाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन
प्रणव देशमुख , जुगल देशमुख ,शुभम चवरे , अनंता भगत , सुनिल शिंगणारे , योगेश देशमुख , भागवत बघे , सत्यंम राऊत , सौरव राऊत, ज्ञानेश्वर घुले , रामकृष्ण सोनाग्रे , शहादेव वाघमारे , रामदास वसतकार , प्रल्हाद हागे , प्रमोद अमृतकर व क्रांतीकारी शेतकरी संघटना पदाधिका यांच्या सह वानखेड येथील बहुसंख्यांक नागरिकांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!