क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य जन्मोत्सव सोहळ्यात संग्रामपुर तालुक्यातील अनुयायी सातारा जिल्ह्यातील नायगाव साठी रवाना


संग्रामपूर [प्रतिनिधी ] सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे उद्या ३ जानेवारी रोजी ग्रामविकास मंत्री ना जयशकुमार गोरे यांच्या संकल्पनेतुन १० एकर जागेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे दिडशे कोटी खर्चातुन भव्य-दिव्य स्मारक सह महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगनराव भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, मंत्रीअतुल सावे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातून माजी आमदार बळीराम शिरस्कार यांचे मार्गदर्शनात फुले-दांपत्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत.
या निमित्ताने संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथून लालपरी बसद्वारे यात्रेकरू उत्साहात रवाना झाले. प्रवासापूर्वी स्थानिक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच बस चालक उमेश ज्ञानेश्वर बोरोकार, सहकारी गोपाल श्रीराम म्हसाळ यांचा शेला टोपी नारळ देवून सत्कार करण्यात आला. राधाकृष्ण मंदिरात विधिवत पूजाअर्चा करून यात्रा सुखकर पार पडावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संग्रामपुर तालुक्यातील अनुयायी ,जेष्ठ नागरिक , मान्यवरांची उपस्थिती होती.


