जिल्हा वार्ता
वरवट बकाल गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनी हजारो भावीकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल भगवंत कॉम्प्ले्समध्ये श्री गजानन महाराज मंदिरात १४८ वा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात उत्साहात साजरा करण्यात आला ग्रंथ पारायण वाचन महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त वरवट बकाल गावातून भव्य दिव्य पालखी सोहळा सकाळी सांप्रदाय भजन मंडळ ढोलाचे भजन मंडळानी भक्तीमय वातावरणात मोठ्या भक्ती गीते गायन करत भक्तांनी सहभाग घेतला पालखी गजानन महाराज मंदिरा गेल्या नंतर महाआरती संपन्न होऊन २५ किंटलचा महाप्रसाद पंचक्रोशीतील हजारो भक्तांना वितरण करण्यात आला यावेळी वरवट बकाल पंचक्रोशीत भक्तीपरवणी ग्रामस्थ उत्सहाचे वातावणरण होते



