चांडोळ नगरीत घुमणार शिवशाहीचा आवाज! झी-युवा फेम शाहीरांच्या पोवाड्यांनी रंगणार शिवजयंतीची पूर्वसंध्या

चांडोळ (बुलडाणा):अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून चांडोळ नगरीत यंदा प्रथमच पोवाडे आणि स्फूर्ती गीतांच्या भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शिव-शंभू व महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा जागर करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम होत आहे.मुख्य आकर्षण: झी-युवा ‘महाराष्ट्राचा शाहीरी बाणा’ फेम महाविजेते युवा शाहीर विक्रांतसिंह राजपूत व त्यांचा १५ जणांचा संच.काय पहायला मिळणार? वीररस कथन, ऐतिहासिक पोवाडे, स्फूर्ती गीते, पथनाट्य, आकर्षक वेशभूषा, लाठीकाठीची प्रात्यक्षिके आणि नयनरम्य आतिषबाजी पूर्वसंध्येला (१८ फेब्रुवारी): सायं. ७ वाजता, होळीचे मैदान येथे भव्य कार्यक्रमाची सुरुवात.मुख्य सोहळा (१९ फेब्रुवारी): सायंकाळी ७ वाजता विविध सांस्कृतिक व साहसी खेळांचे सादरीकरण.
आयोजक: शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील गुजर, सामाजिक कार्यकर्ते दीपक धनावत, शिवसेना उपतालुकाप्रमुख मयूर पडोळ व समस्त ग्रामस्थ मंडळी, चांडोळ (ता. जि. बुलडाणा).
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चांडोळसह पंचक्रोशीतील तमाम शिवभक्त आणि महाराणा प्रताप यांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि हा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.



