शिक्षण

पातुर्डा ब्रम्हकुमारी सेवा केंन्द्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त गावातुन भगवाण शंकर पार्वती व लक्ष्मी नारायण देखाण्याची शोभायात्रा मिरवणुक

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा ब्रम्हकुमारी सेवा केंन्द्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त गावातुन भगवाण शंकर पार्वती व लक्ष्मी नारायण देखाण्याची शोभायात्रा मिरवणुक काढण्यात आली यावेळी गावात शोभायात्रा मिरवणुक दरम्यान महिलांनी आर्कषण रांगोळी काढून भगवान शंकर पार्वती व लक्ष्मी नारायण चे पुजन आरती , दर्शन घेत फुलांचा वर्षाव करून ठिक ठिकाणी स्वागत केले सदर शोभायात्रा मिरवणुकीत ब्रम्हकुमार भाऊ ब्रम्हकुमारी बहिणींनी सहभागी होऊन नैतिक आध्यात्मीक मुल्याची जागृती अनुभवली शोभायात्रा मिरवणुकीचा समारोप पातुर्डा ब्रम्हकुमारी सेवा केंन्द्रात छोटे खानी कार्यक्रमात उत्सहात संपन्न झाला महाशिवरात्री निमित्त छोटे खानी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रणजीत गंगतीरे हे होते तर सामाजीक कार्यकर्ते शिवकुमार चांडक, प्रकाश अरबट , सुदेशनाताई भोंगळ , केंन्द्रसंचालीका छाया दिदि , ब्रम्हकुमारी शितल बहेन, ब्रम्हकुमार ऋषीकेश भाऊ आदि मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी छाया दिदि यांनी महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्रीचे आध्यात्मीक महत्व सांगीतले खरी महाशिवरात्री म्हणे अज्ञानरूपी अंधकारातुन ज्ञानरूपी प्रकाशाकडे जाने आहे यावेळी सामाजीक कार्यकर्ते शिवकुमार चांडक यांनी महाशिवरात्री निमित्त भगवान शंकर पार्वती यांच्या आध्यात्मिक महत्व या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले संचालन ब्रम्हकुमारी शितल बहेन यांनी केले तर ब्रम्हकुमार ऋषीकेश यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!