खडकी येथे मॉ जिजाऊ बहु उद्देशीय महिला मंडळच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती उत्सहात

अकोला [प्रतिनिधी ] येथील मॉ जिजाऊ बहुउद्देशीय
महिला मंडळ खडकी यांच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे या वर्षीय मॉ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळाचे अध्यक्ष नयना सरदार व सर्व महिला सदस्य यांनी संत गाडगे बाबा यांचे प्रेरणा घेऊन परिसर स्वच्छ करून खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली.कार्यक्रमाध्ये राजू सरदार यांनी गाडगे महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश संत गाडगे महाराज यांच्या आजीवन समाज प्रबोधन विषयी माहिती देऊन स्वच्छता , अंधश्रद्धा निर्मूलन या बाबत गाडगे महाराज यांचे कार्यावर प्रकाश टाकला तर विजय शेगोकर यांनी गाडगे महाराज यांनी कीर्तन द्वारे समाजप्रबोधन जनजागृती करून त्यांनी निस्वार्थ समाज सुधारणे साठी केलेले कार्य याची विस्तृत माहिती दिली .कार्यक्रमाला प्रतिभा सुरवाडे, तिलोत्तमा शेगोकर, सुरक्षा अंभोरे,मोहिनी जामनिक, पूजा सुरवाडे, रमा सदांशिव,मिनू सुरवाडे व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी शुभम सुरवाडे यांचे विशेष सहकार्य केले



