जिल्हा वार्ताशिक्षण
पातुर्डा पीएमश्री जि प हा चे १३ विद्यार्थी एनएमएमएस परिक्षा उतीर्ण शिक्षकांचे प्रोत्सान योग्य मार्गदर्शनाचे फळ


संग्रामपुर [प्रतिनिधी ] शिक्षण विभागा करवी वर्ग ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी साठी एनएमएमएस परिक्षा शैक्षणिक सत्र 2025 / 26 मध्ये घेण्यात आली यात पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल च्या १३ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परिक्षा घवघवीत यश मिळविले एनएमएमएस शिक्षण विभागा कडून मेरिड लिस्ट नुसार जाहिर झालेल्या पात्र विद्यार्थीला प्रति वर्ष १२ हजार ८ ते १२ वी पर्यंत ४८ हजार शिष्यवृती मिळणार आहे उत्तीर्ण विद्यार्थी मध्ये महावीर देशमुख ,मानव इंगळे गणेश निमकर्डे ,शिवम शिरोडकर ,अंकुश वानखडे ,ओम ढोकणे ,कुंदन खंडेराव विराज दांडगे ,नयना धर्माळ
प्रतीक्षा दाभाडे ,पायल दाभाडे खुशी दाभाडे ,अंकिता भोजने यांचा समावेश आहे एनएमएमएस परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्सान देणारे मार्गदर्शन वर्गशिक्षक एम. एस.जुमडे, एस. एस कराड, यांचे प्राचार्य आर. एस मावसकर , व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णु पाटील यांनी गुलपुष्प देऊन कौतुक केले यावेळी प्राचार्य आर एस मावस्कर , शिक्षक दसोरे सर, हरिहर मानकर , उभे , लिपीक बोरसे , श्लोक राऊत, शिक्षीका मानकर , पाठक मॅडम, सोनाग्रे , गुरव मॅडम, डायलकर मॅडम, येंबडवार मॅडम इत्यादी शिक्षक शिक्षिका सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .



