ब्रेकिंग न्यूज

दोन होमगार्डच्या सतर्कतेमुळे वाचले युवकाचे प्राण

मंगरूळ नवघरे (प्रतिनिधी)  : चिखली-अमडापूर रोडवरीलदहिगावजवळ घडलेल्या घटनेत दोन होमगार्डच्या कार्यतत्परतेमुळे एका युवकाचा जीव वाचला आहे. सागर संतोषराव लंके आणि सागर काशिनाथ येवले हे दोघे होमगार्ड कर्तव्यासाठी अमडापूर पोलिस स्टेशनकडे येत असताना, १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद तेजसिंह देव्हडे (रा. नागपूर) हा युवक दहिगाव शिवारातील सागर गवळी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत होता.त्या वेळी चिखलीकडून येत असलेल्या दोन्ही होमगार्डच्या नजरेस ही घटना पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ धाव घेत युवकाला अडवले आणि सुरक्षितपणे विहिरीपासून दूर आणले. यानंतर त्यांनी त्या युवकाला अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये आणून सुपूर्द केले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय टेकाळे करीत आहेत. तसेच संबंधित युवकाची नातेवाईकांनी ओळख पटवण्यासाठी ८००७७७७३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार निखिल निर्मळ यांनी केले आहे. दोन्ही होमगार्ड सागर लंके आणि सागर येवले यांच्या वेळेवर दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे एका युवकाचा जीव वाचला असून, त्यांच्या या धाडसी आणि जबाबदार कृतीचे अमडापूर पोलिसांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!