राजकीय

पातुर्डा ग्रा पं उपसरपंच पदि श्रीमती सुमनबाई तायडे अविरोध

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु ग्रा पं उपसरपंच पदाचा ठरल्या प्रमाणे कार्यकाल संपल्याने उपसरपंच यांनी राजीनामा दिला पातुर्डा बु ग्रा पं सभागृहात उपसरपंच पद निवड संदर्भात लोकनियुक्त सरपंच रणजीत रामदास गंगतीरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रा पं सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी पातुर्डा ग्रा पं उपसरपंचपदी श्रीमती सुमनबाई गजानन तायडे यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच अविरोध निवड झाल्या बद्दल श्रीमती सुमनबाई तायडे यांचा माजी उपसरपंच तथा विदमान ग्रा पं सदस्या शोभाताई कृष्णराव राहाटे यांनी हार , शाल घालुन सत्कार केला यावेळी ग्रामविकास अधिकारी डी जी मारोडे , सर्व ग्रा पं सदस्य सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!