आस्वंद शिवारात हिस्त्र वनप्राण्याने पाडला काळविटाचा फडशा

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील आस्वंद शेत शिवारात दि २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री काळविटावर हिस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केले व फस्त केल्याची घटना शेतकरी निखिल लाहे शेतात गेल्या नंतर निदर्शनास आले आज दि २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सदर घटना उघडकीस आली याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील आस्वंद शिवारात शेतकरी निखिल लाहे यांनी शेतात कांदा लागवड करण्यासाठी शेतात रोटाव्हेटर मारुन शेती तयार केली शेत पाहणी साठी गेले हिस्त्र वनप्राण्याने काळविटास आपले भक्ष्य बनविले व सदर काळविट मुत्यू अवस्थेत मिळून आले याची माहिती खरेदी विक्री संचालक संजय वाकळे यांनी वनविभागाला दुरध्वनी व्दारे दिल्यावरुन जळगाव जा वनपरिक्षेत्र अधिकारी एन एन काळे, वनपाल सावळे , वनरक्षक जी एस साखळे , गणेश तराळे वनकर्मचाऱ्या सह घटना स्थळी दाखल झाल्या नंतर नर जातीचा अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा काळविट मृत अवस्थेत आढळला हिस्त्र वनप्राण्याचे पायाचे ठसे शोध कामी परिसर पिंजुन परंतु शेतात रोट्याव्हेटर मारल्याने हिस्त्र प्राण्याचे ठसे मिळून आले नाही स्थळ पंचनामा केला तसेच या परिसरात नेमका हिस्त्र वन प्राणी कोणता याचा शोध लावण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एन एन काळे यांनी दिली यावेळी शेतकरी सुनिल मेहेगे , बाबुराव सुलताने , गोवर्धन भोजने , शरद लाहे आदि शेतकरी उपस्थित होते
आस्वंद कुदेगाव टाकळी पंच परिसरातील वनप्राण्याचा बंदोबस्त करा – संजय वाकळे
अतिवृष्टीमुळे खरिप पिकाचे नुकसान झाले त्यात वनप्राण्यानी या परिसरातील शेती पिकांचे नुकसान केले रब्बी पिक पेरणी साठी शेतकऱ्यांनी मशागत करून शेती रब्बी पिक पेरणी योग्य तयार केली काहि शेतकऱ्यांनी हरबरा , कांदा लागवड केली आहे रात्री वेळी अवेळी शेतकरी शेतात पिकाची निगा राखण्यासाठी पिकाची राखन करण्यासाठी शेतात जातात हिस्त्र वन प्राण्याने काळविटचा फडशा पाडून आपले भक्ष्य बनविने शेतकरी भयभित झाले असुन हिस्त्र प्राण्याच्या हलल्याचा धोका लक्षात घेता तसेच रब्बी पिकाचे नुकसान होऊ नये तसेच शेतकऱ्यांच्या सरंक्षणाच्या दुष्टीकोनातुन वन प्राण्या सह हिस्त्र वनप्राण्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मांगणी खरेदी विक्री संचालक शेतकरी संजय वाकळे यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यां कडून होत आहे



