चिखलीमध्ये कमळाच्या रूपाने विकास फुलवा!… आ. सौ. श्वेता महाले पाटील.
चिखलीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या प्रचार कार्यालयाचे आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते उद्घाटन..

चिखली : भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात बोलताना आ. सौ. महाले यांनी चिखली शहराच्या पायाभूत सुविधांपासून नागरी सेवांपर्यंत अनेक विकास विषयांवर अपेक्षा व्यक्त केल्या. त्यानुसार शहरात येत्या काळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थापन आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांसारख्या क्षेत्रांत अधिक प्रभावी कामांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करून चिखली न. प. वर कमळ फुलवायचे आहे, असे त्या म्हणाल्या.आमदार श्वेता महाले यांनी चिखलीतील नागरिकांच्या मागण्या, शहराची वाढती लोकसंख्या, तसेच भविष्यातील विकास आराखडा यांचा उल्लेख करत, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कामकाजाची गरज आहे,” पंडितदादा यांच्या रूपाने आपण अतिशय सक्षम उमेदवार दिलेला असून त्यांना मोठ्या पदाधिक्याने विजयी करायचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच राज्य व केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा योजनांमुळे शहरांना विकासाची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.उद्घाटन प्रसंगी विविध सामाजिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहिली.उद्घाटन सोहळ्याला चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण दादा शेटे, तसेच संजय छके, सुरेश अप्पा कबुतरे, शिवराज पाटील, संजय गाडेकर, पंजाबराव धनवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



