शासकीय

नायलॉन मांजा विक्रेते व वापरकर्ते खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास कठोर कारवाई : ठाणेदार सोनवणे

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] मकर संक्रांत सन उत्सव सर्वत्र मोठ्या उत्सहात साजरा केला जातो मकर संक्रांत दरम्यान पतंग उडविण्याची हौस बच्चा कंपनी सह मोठ्याना असते पतंग उडवितांना नॉयलान मांजाचा वापर करणे तसेच नॉयलान मांचा विक्रीसाठी साठवुन ठेवणे दंडणीय अपराध आहे तेव्हा वेळी सावध व्हा कारण विक्रेते व वापरकर्ते खबरदार नायलॉन मांजाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा ईशारा तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे शासनाने बंदी घातलेल्या मानवा सह पशु जनावरांच्या जीवीतास घातक ठरणारा चायनीज नायलॉन मांजा पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर अल्पवयीन मुले सर्रास मोठ्या प्रमाणात वापर करित आहेत तालुक्यात चायना मांजाने गळा चिरुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत चायना नायलॉन मांजा च्या वापरामुळे अपघाताची पुर्नरावृत्ती होता कामा नाही न्यायलयाच्या आदेशानुसार नायलॉन चायना मांजा बाळगणे त्याचा वापर करणे खरेदी विक्री करणे दंडणीय गुन्हा आहे दुकानावरून नायलॉन चायना मांजा होत असल्यास तसेच अल्पवयीन मुले पतंग उडवितांना नायलॉन चायना मांजाचा वापर करतांना मिळून आल्यास संबंधीत मुलाच्या पालकावर तसेच नायलॉन चायना मांजा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा देत नायलॉन चायना मांजा विक्री तसेच पतंग उडवितांना मानव पशु पक्षी साठी घातक असलेला नायलॉन चायना मांजा वापर करणाऱ्याची माहितीसाठी तामगाव पोस्टेशी संपर्क साधण्याचे आव्हाण ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!