संग्रामपूर तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा

संग्रामपूर [प्रतिनिधी ] आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला . येथील रेणुका माता मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वर्गीय केशवराव अण्णा घाटे यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले त्यांना तालुका पत्रकार संघाच्या वतीने यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी भाऊ भोजने प्रल्हाद दातार प्रल्हाद सावतकर भगवान पाखरे इत्यादींनी मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय केशवराव घाटे यांच्या जीवन चरित्रावर भाषणातून प्रकाश टाकला . तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे यांचे याच वर्षात वृद्धापकाळाने निधन झाले असल्याने सातपुडा व इतरही पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली केशव घाटे यांचे निधन झाल्याने पत्रकार संघाच्या नवीन संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदावर सर्वानुमते लवकरच कोणाची तरी निवड करण्यात यावी अशी सुचना यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद दातार रामेश्वर गायकी यांनी व्यक्त केली . यानंतर येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते विलासराव देशमुख यांनी सप्रेम भेट दिलेल्या स्वर्गीय केशवराव घाटे यांच्या प्रतिमेचे अनावरण करून पत्रकार भवनातील सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आले. यावेळी भाऊ भोजने , प्रल्हाद सावतकर ,प्रल्हाद दातार , युसुफ शेख ,नारायण सावतकर , रामेश्वर गायकी , काशिनाथ मानकर , दयालसिंग चव्हाण , नंदकिशोर शिरसोले , सतीश वानखडे ‘ संतोष आगलावे ,पंजाब ठाकरे , रवींद्र दांडगे , महेश घाटे , सचिन पाटील सेवा निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ सहदेवराव गोतमारे , रवींद्र सिरस्कार ,सुनील मुकुंद ,भास्कर बोंद्रे ,भारत इंगळे अजहरअली , ज्ञानेश्वर दांदळे शेख कदीर , अशोक आकोटकार विवेक राऊत, राजेंद्र धर्माधिकारी , भगवान पाखरे , कासम सुरतने गोपाल इंगळे श्याम देशमुख एमडी अजहर मोहम्मद ,शेख अब्दुल शेख लुकमान कासम सुरत्ने निलेश तायडे , कैलास खोटे प्रभुदास पारस्कर, डॉ संतोष लांडे, रवि मनसुटे ,आकाश पालीवाल सुनील ढगे सुचित धनगर मोहन सोनोने विठ्ठल निंबोळकर सुमित दामोदर साबीर खान पठाण गोपाल धर्माळ , सागर कापसे, रतन भगत , सतीश जवंजाळ , यांचे सह संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते . संचलन नारायण सावतकर केले



