राजकीय
पळशी झाशी ग्रा.प.सरपंच पदी सौ. प्रियंका राहुल मेटांगे तर उपसरपंच पदी पंचफुलाबाई पवार अविरोध
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथील सरपंच उपसरपंच यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर दोन्ही पदे रिक्त होते पळशी झाशी सरपंच उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज असल्याने सरपंच व उपसरपंच पदासाठी दि १९ जून रोजी निवडणुक घेण्यात आली पळशी झाशी ग्रा पं सरपंच पदी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या प्रियंका राहुल मेटांगे यांची तर उपसरपंच पदी पंचफुलाबाई पवार यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्वेसर्वा तेजराव मारोडे, कैलास मारोडे, विजय मारोडे, राजेश मुयांडे, माजी जि प सदस्य भगतसिंग पवार प्रकाश राहणे, श्रीराम बांगर,राजेश इंगळे, माजी सरपंच अभयसिंह मारोडे, माजी सरपंच संगीता चीतोडे माजी उपसरपंच. वर्षा ताई बाळू बांगार, माजी उपसरपंच अमोल दामले, शिवा ठाकरे,विष्णू मारोडे,विशाल बांगर, गोपाल मारोडे गजानन भड, प्रशांत मारोडे, संदीप मेटांगे, स्पप्नील मारोडे, ,रामदास कुयटे,हरिदास बांगर, प्रतीक वाघ, सुनील उगले, वानखडे, ओम मेटांगे, सोहम मारोडे, जय मेटांगे, तसेच सह पॅनल प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून महसूल चे यू.पी.बुरजे, तलाठी रंगदड व ग्रामसेवक हेमंत देशमुख यांनी काम पाहिले. निवडणुक अध्यासी अधिकारी यु पी बुरजे यांनी सरपंच उपसरपंच अविरोध झाल्याची घोषणा करताच फटाके फोडून नवनिर्वाचित महिला सरपंच प्रियंका मेटांगे व उपसरपंच पंचफुला पवार यांचा सत्कार करण्यात आला