Uncategorized

ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव शिवलीला अमृत ग्रंथ पारायण वाचन संपन्न

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त शिवलीला अमृत ग्रंथ पारायण वाचन व भक्तांना फराळ वितरण करण्यात आले ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर उपवासाचा फराळ वाटप करणे ही एक सेवा मानली जाते. भाविकांसाठी सात्विक आणि ऊर्जा देणारा फराळ वाटप करण्यात आले तसेच मंदिर परिसरात गावातील महिलांनी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण वाचन केले यावेळी सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मांदीयाडी दिसून आली पहाटेपासून काकड आरती सुरू होतो महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला तब्बल एक क्विंटल साबुदाण्याची उसळ व चहा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आयोजकांनी वितरण केले गावात सकाळपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले असता मंदिरात महिला व ग्रामस्थांची एकच गर्दी दिसून आली यावेळी सरपंच प्रतिभा इंगळे. पवन अस्वार. गोवर्धन फाटे. संतोष मोहोड. गणेश दातार. नामदेव टाकळकर. विश्वनाथ टाकळकर. प्रल्हाद अस्वार.संतोष ईर्गोकार.राजेश टाकळकर. संतोष ढगे. विजय ईगळे.मोतीराम ढगे. तुळशीराम भोपळे.रमेश माकोडे.सुनील डामरे.रामभाऊ दातार. राजेश ढगे. गणेश डाबरे. किशोर फाटे. अरुण वानरे. प्रशांत वानखडे.रामदास धुर्डे.गोपाल भुसारी. वासुदेव सळतकार. सदानंद फाटे. गुड्ड्या सावतकार यांच्या सह महिलानी देखील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!