विद्युत कार्यालयात १० वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगाराला कामावरुन कमी केल्याने दामोदर कंत्राटी कामगाराचा न्याय हक्कासाठी कुटुंबा सह आमरण उपोषणाचा ईशारा
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील उकळगाव येथील रहिवासी कंत्राटी कामगार प्रदिप दामोदर याने गेल्या १० वर्ष ईमाने इतबारे संग्रामपुर विद्युत कार्यालया अंतर्गत कंत्राटी कामगार म्हणुन सेवा दिली व विद्युत कार्यालय कडून ८५% जागा कंत्राटी कामगाराचे भरण्यात येतील यापुर्वी विद्युत वितरण कार्यालय संग्रामपुर उपविभाग अंतर्गत १ जागा रिक्त होती सदर रिक्त जागा प्रमोशन सिनीअर टेक्नीशीयन म्हणुन भरली व १० वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगार प्रदिप शंकर दामोदर याला sc प्रवर्गात येत असल्याने व चिरीमीरी घेऊन आर्थिक लाभासाठी कामा वरुन कमी केल्याचा आरोप संबंधीत कंत्राटी कामगाराने विद्युत वितरण कार्यालयाला दिलेल्या निवेदनातुन केला आहे सदर रिक्त जागे वर नियुक्ती केलेल्या कर्मचारीचे शिक्षण पात्रता नसतांना निवड अधिकाऱ्यानी निवड केल्याचे निवेदनात नमुद आहे जुन्या कंत्राटी कामगाराला कामावरुन काढता येत नसल्याचा नियम असतांना १० वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगाराला न्याय मिळावा म्हणुन वरिष्ट अधिकारी यांनी चौकशी करुन कंत्राटी कामगाराला पुर्वरत कामावर रुजु करुन न्याय द्यावा अन्यथा १ ऑक्टोंबर पासुन संग्रामपुर उपविभाग विद्युत कार्यालय समोर परिवारा सह आमरण उपोषण करण्याचा ईशारा कंत्राटी कामगार प्रदिप दामोदर याने विद्युत वितरण कार्यालयाला दिलेल्या निवेदनातुन दिला आहे