निधन वार्ता

बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी हाजी शेख मजीद यांचे निधन ; मलकापूर रोड कब्रस्तानात अंत्यसंस्कार

बुलढाणा ( प्रतिनिधी ) : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे (बी डी सी सी बँक) सेवानिवृत्त कर्मचारी हाजी शेख मजीद शेख रहेमान (वय ७७ वर्षे) यांचे आज, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बँक कर्मचारी वर्तुळात तसेच आप्तेष्टांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दुपारी २:०० वाजता मलकापूर रोडवरील मुस्लिम कब्रस्तानमध्ये नातेवाईक, मित्रपरिवार व बँकेतील आजी-माजी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (सुपूर्द-ए-खाक) करण्यात आले.हाजी शेख मजीद यांनी बँकेत दीर्घकाळ प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे, भाऊ, बहीण असा मोठा आप्तपरिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!