पातुडर्यात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी पुर्व नोंदणी सुरु शेतकऱ्यांनी कादगपत्रे जमा करण्याचे आव्हान


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील शेतकरी भाजी पाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था , दि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लि. नागपुर शाखा मलकापुर यांच्या संयुक्त विदमाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी साठी दि ३० ऑक्टोंबर पासुन नोंदणी सुरु असुन पातुर्डा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड केंन्द्रावर सातबारा पेरेपत्र मुळप्रत तलाठी सहि शिक्यानीसी , बॅक पासबुक आधार कार्ड झेराक्स , मो नं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी होणार असल्याने संबंधीत शेतकरीने उपस्थित राहने अनिवार्य आहे नाफेड अंतर्गत सोयाबीन शासकीय हमीभाव सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटल खरेदी करण्यात येणार आहे पातुर्डा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड केंन्दावर नोंदणी करुन शेत माल विक्री करावा असे आव्हान शेतकरी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था पातुर्डा अध्यक्ष अड विरेन्द्र विश्वनाथ झाडोकार यांनी एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे
बॉक्स
बॉयोमॅट्रीक पध्दत शिथील करा शेतकऱ्यांची मांगणी
गेल्या काहि दिवसा पासुन नाफेड खरेदी केंन्द्र सुरु करण्याची मांगणी शेतकरी करित असतांना अखेर नाफेड केंन्द्रावर नोंदणी ३० ऑक्टोंबर पासुन सुरु करण्यात आले बॉयोमॅट्रीक नोंदनी साठी १ शेतकऱ्याला अर्धा तास लागत आहे पातुर्डा नाफेड केंन्द्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या दिवस भरात ३० शेतकऱ्यांची नोंद झाली शासनाच्या बॉयोमॅट्रीक किचकट पध्दती अभावी जवळ पास ९० ते १०० शेतकऱ्यांना परत रागेत उभे राहून नोंदणी करावी लागणार बॉयोमॅट्रीक साठी नंबर लागल्या नंतर थंब येत नसल्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागत आहे शासनाने खरेदी करतांना बॉयोमॅट्रीक पध्दतीची सक्ती करावी परंतु नोंदणी साठी बॉयोमॅट्रीक एवजी शेतकऱ्यांच्या आधार मों नं वर ओटीपी व्दारे नोंदणी पध्दतीचा अवलंब करावा व बॉयोमॅट्रीक पध्दत नोंदणी शिथील करावी अशी मांगणी त्रस्त शेतकरी वर्गा कडून जोर धरत आहे याकडे नाफेड च्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे



