महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदि वासुदेव सुबेदार

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी सेवा निवृत्त उच्च श्रेणी मुख्यध्यापक वासुदेव लक्षमण सुबेदार यांची महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदि नियुक्ती केली आहे सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे तालुक्यातील संघटना वाढीच्या तन मन धनाने कार्य करुन संघटनेच्या माध्यमातुन तालुक्यातील सेवा निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडून न्याय हक्क मिळवुन द्यावे असे नियुक्तीपत्रात नमुद आहे नियुक्त पत्र देता वेळी बुलडाणा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काकडे, चिखली तालुकाध्यक्ष गजानन नावकर ,जिल्हा संघटक रविंद्र बावस्कर ,मोताळा तालुका सरचिटणीस,सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कानडजे चिखली सी ए अंभोरे , इतर मान्यवर शिक्षकांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी वासुदेव सुबेदार यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे तालुक्यातील सेवा निवृत शिक्षक कर्मचारी सह सर्व स्तरावरून कौतुक होत आहे



