चिखलीत आत्मोन्नती पिरॅमिड ध्यान केंद्राचे उद्घाटन; निःशुल्क ध्यान शिबिराचे आयोजन

चिखलीत आत्मोन्नती पिरॅमिड ध्यान केंद्राचे उद्घाटन; निःशुल्क ध्यान शिबिराचे आयोजन
चिखली (प्रतिनिधी): चिखली शहरात अध्यात्मिक व मानसिक आरोग्यास चालना देणाऱ्या आत्मोन्नती पिरॅमिड ध्यान केंद्राचे उद्घाटन रविवार, दि. 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार आहे. या उद्घाटनप्रसंगी नागरिकांसाठी निःशुल्क पिरॅमिड ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ध्यान शिबिर दुपारी 12.30 ते 3.30 वाजेपर्यंत होणार असून, शिबिरामध्ये पिरॅमिड ध्यानाचे शास्त्र, मानसिक शांती, तणावमुक्त जीवन, एकाग्रता वाढ आणि सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या शिबिरासाठी शंम्पा मुखर्जी (सिनीयर पिरॅमिड मास्टर) व देवयानी नवगजे (सिनीयर पिरॅमिड मास्टर) हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता अन्नप्रसाद ठेवण्यात आला आहे. श्रीकांत ज्वेलर्सचा वरचा मजला, महाराणा प्रताप पुतळ्याजवळ, डी.पी. रोड, चिखली, जि. बुलडाणा, या ठिकाणी हा उपक्रम पिरॅमिड लाईट वर्कर टीम, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.अधिक माहितीसाठी 9923151530 / 7020728071 / 7218180160 / 8087487719 या क्रमांकावर संपर्क करण्याचे तसेच शहरातील नागरिकांनी या निःशुल्क ध्यान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



